महाराष्ट्र ट्रायबल न्युज

दिंडोरी, पेठ नगरपंचायत स्वबळावर लढा : खा. शिंदे दिंडोरी - पेठ विधानसभा शिवसेनेचा आढावा बैठक

दिंडोरी । प्रतिनिधी :- दिंडोरी व पेठ विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या वतीने भरघोस निधी देण्यात आला आहे. पुढील काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका आपल्याला लढवायच्या आहेत, परंतु दिंडोरी आणि पेठ नगरपंचायत निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी करावी, असे प्रतिपादन शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले. ङ्गदिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे दिंडोरी व पेठ विधानसभा शिवसेनेचा आढावा घेण्यात आला. त्याप्रसंगी खासदार शिंदे बोलत होते. 
     व्यासपीठावर संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हा संपर्कमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दादा भुसे, पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील, नाशिक लोकसभा संपर्कप्रमुख आमदार सुहास कांदे, माजी खासदार आनंद परांजपे, माजी आमदार धनराज महाले, जिल्हाप्रमुख भाऊराव तांबडे, ज्येष्ठ नेते सुरेश डोखळे, संपर्क नेते सुनील पाटील, तालुकाप्रमुख किशोर कदम, युवा सेना जिल्हाप्रमुख वैभव महाले,    अतुल वाघ, सुरेश देशमुख, सचिन देशमुख, सुजित मुरकूटे, हेमंत पगारे  आदींसह दिंडोरी - पेठ विधानसभा मतदार संघातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की,  आपल्याला नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये स्वभावाची तयारी करायची आहे, त्यानुसार उमेदवारांची चाचपणी आतापासूनच करून ठेवा. जो निधी दिला आहे त्याचा विनिमय कशाप्रकारे झाला ते जनतेपर्यंत पोहोचवा. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी व्युहरचना करा आणि विशेषत: मतदार नोंदणीवर भर द्या. बोगस मतदार यादीतून दूर काढा. बेलो टू यांची नेमणूक करा आणि काम करून घ्या. पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी आपापसातील मतभेद दूर करावे असे आवाहनही खा. श्रीकांत शिंदे यांनी केले. यावेळी संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, सुरेश डोखळे, सुनील पाटील, माजी आमदार धनराज महाले, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांनीही मतदारसंघाचा आढावा सादर केला. दिंडोरी भेट मतदार संघातील सर्व बूथ समिती प्रगनक यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे काम सुरू असल्याचे माजी आमदार धनराज महाले यांनी सांगितले. धनराज महाले यांच्यावर विधानसभा संपर्कप्रमुख जबाबदारी असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगून विधानसभेत धनराज महाले यांचे चांगले काम सुरू असल्याचे शिंदे म्हणाले. गट व गण निहाय माहिती जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांनी दिले. यावेळी तालुकाप्रमुख अमोल (किशोर) कदम यांनी आढावा दिला. याप्रसंगी आजी-माजी आमदार, नगरपंचायतीचे आजी - माजी नगराध्यक्ष व नगरसेवक, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, शहरप्रमुख उपशहरप्रमुख, गट व गण प्रमुख, शाखाप्रमुख तसेच, युवासेना जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, शाखाप्रमुख, महिला आघाडी, जिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, तसेच आजी माजी जि. प.  व पं. स. सदस्य, पदाधिकारी, बुथप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, शेतकरी, शिवसैनिके उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने