दिंडोरी | मनोज पाटील:- अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या वाढदिवसानिमित्त दिंडोरी येथील शिवाजीनगर परिसरात उभारण्यात येत असलेल्या पत्रकार भवनाच्या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी आदिवासी विकास महामंडळाचे संचालक गोकुळ झिरवाळ, नगरसेवक अविनाश जाधव, नितीन गांगुर्डे, मराठी पत्रकार संघाचे संस्थापक संतोष कथार, तालुकाध्यक्ष विलास ढाकणे, माजी अध्यक्ष भगवान गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब अस्वले, अशोक निकम, किशोर जाधव, महेंद्र पैठणे, श्रीराम देवकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष प्रतीक जाधव, विकी घोलप, अजित कड, परीक्षित देशमुख,डॉ.विजय गटकळ, दिपक धूमणे, संग्राम देशमुख, अमोल देशमुख, जलील शेख,शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत उपस्थितांनी वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला. पत्रकार भवन परिसर हिरवागार करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. उपस्थितांनी मंत्री झिरवाळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक व विकासकामांचा गौरव केला.