अवनखेड l प्रतिनिधी:- पेर्नोड रिकार्ड इंडियातर्फे (Pernod Ricard India) जागतिक मोहिमेचा एक भाग म्हणून 'रिस्पॉन्सिबल ऑल डे' (Responsible All Day) या उपक्रमांतर्गत येत्या गुरुवारी, ११ जून २०२६ रोजी विशेष कार्यशाळेचे आयोजन केले होते.संपूर्ण जून महिन्यात जागतिक स्तरावर साजरी केली जाणारी ही मोहीम समुदाय आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षा जागरूकता, जबाबदारी आणि शाश्वत वर्तणुकीला प्रोत्साहन देते. याच पार्श्वभूमीवर स्थानिक महिला बचत गट (SHG) सदस्य, समुदाय प्रतिनिधी आणि स्थानिक भागधारकांसाठी या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले आहे. यामध्ये प्रामुख्याने यंत्रसामग्री हाताळताना घ्यायची काळजी, साबण बनवणे, मेणबत्ती बनवण्याच्या प्रक्रिया तसेच कामाच्या ठिकाणी आणि घरातील सामान्य सुरक्षा पद्धतींवर तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले तसेच अग्निसुरक्षेचे धडे आणि आपत्कालीन सज्जता कामाच्या ठिकाणी आणि घरगुती पातळीवर सुरक्षित कामाची संस्कृती निर्माण करणे हे या कार्यक्रमाचे मुख्य उदिष्ट होत. यासाठी कंपनीच्या प्लँट टीमकडून विविध प्रात्यक्षिके दाखवली जातील. विशेषतः महिलांना व्यावसायिक सुरक्षेची व्यावहारिक समज मिळावी म्हणून अग्निसुरक्षा सज्जता आणि आपत्कालीन परिस्थितीतील प्रतिसादाचे (Emergency Response) थेट प्रात्यक्षिक या प्रसंगी सादर केले जाणार आहे.
या कार्यक्रमाला अवनखेड गावाचे सरपंच मा. नरेंद्र जाधव, ग्रामपंचायत अधिकारी मा. सुभाष कर्डक,MSRLM मधील मा.ज्योती बागुल,मा. बाळासाहेब तिदमे,पर्नोर्ड रेकार्ड इंडिया नाशिक प्लांट मा. शरद नागरे, मा. संदीप फुके, मा. वैभव देशमुख, मा. विदुर सर, दिल्ली सी. एस. आर. मा. आयुषी पांडे प्लँट टीमचे सरकारी अधिकारी आणि इकोसॅन सर्विसेस फाउंडेशन पुणे येथील मा. भाग्यश्री करांकर, मा. साजन गुळवे स्थानिक समुदाय भागधारक उपस्थित राहून परस्परसंवादी चर्चा केली. या उपक्रमामुळे उपजीविकेच्या साधनांमध्ये सुरक्षित संचालन पद्धतींना मोठी मदत मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. इकोसॅन सर्विसेस फॉउंडेशन यांचे वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक आदित्य भेडसगावकर, तसेच प्रकल्प व्यवस्थापक सानिका घळसासी यांचे मार्गदर्शन मिळाले व त्यावेळी त्यांचा फील्ड स्टाफ तृप्ती पाटील, ओम डोकफोडे, गायत्री चव्हाण व सुमेध मोरे यांनी वेगवेगळ्या विविध उपक्रमद्वारे बाबत जनजागृती केली.