maharashtratribalnews

मा आदिवासी विकास आयुक्त यांना विविध शैक्षणिक अ सुविधां बाबत दिले निवेदन.

नाशिक l प्रतिनिधी:-दि. 8 जुलै रोजी मा आयुक्त आदिवासी विकास विभाग माननीय बनसोडे मॅडम यांची भेट घेऊन गेल्या 22 दिवसांपासून शाळा सुरू असून अद्याप पर्यंत अनेक शाळेमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, कामाठी नाहीत ज्यामुळे विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित आहेत, स्वयंपाकी व कामाठी नसल्याने खिचडी खाऊन दिवस काढावे लागत आहेत. त्याचप्रमाणे शैक्षणिक साहित्य अद्याप पर्यंत उपलब्ध न झाल्याने मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. या संदर्भात चर्चा करून निवेदन देण्यात आले. 
      दि.15 जुलैपर्यंत वरील सुविधा व शिक्षक उपलब्ध न झाल्यास पालक, विद्यार्थी व आदिवासी संघटना शाळेला कुलूप बंद आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला. त्यावर माननीय आयुक्त यांनी पंधरा दिवसात वरील सर्व बाबी उपलब्ध करून दिल्या जातील असे आश्वासन दिले.
      त्यानंतर जातपडताळणी वेळी खोटे कागटपत्र सादर करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचा अनेक दिवसाच्या प्रयत्नाला यश मिळवून देणारे मा अप्पर आयुक्त माननीय वसावे साहेब यांचा सन्मान करण्यात आला. दुपारी चार वाजता गोल्फक्लब मैदानावर उपोषणास बसलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास भेट देऊन समर्थन केले.
     याप्रसंगी महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानचे केंद्रीय अध्यक्ष अशोक बागुल जिल्हाध्यक्ष राम चौरे उत्तर महाराष्ट्र प्रमुख मुनाफ तडवी ऑल इंडिया फेडरेशनचे अध्यक्ष के के गांगुर्डे खजिनदार चिंतामण गायकवाड जेष्ठ मार्गदर्शक सखाराम दादा भोये,मा सरपंच विलास चव्हाण,स्कुल कमिटी अध्यक्ष जगण जगताप, सदस्य दत्तू देशमुख, शिवमण ठाकरे, गुलाब ठाकरे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने