महाराष्ट्र ट्रायबल न्युज

शासकीय माध्यमिक आश्रमशाळा मुरंबी व शिरसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाज्या महोत्सव चे मोठ्या उत्साहात आयोजन

त्र्यंबकेश्वर l प्रतिनिधी:-आज दिनांक 9/7/2025 रोजी सकाळी ठिक 12.00 वाजता शिरसगाव आश्रमशाळेतील बहुउद्देशीय सभागृहात शिरसगाव आश्रमशाळेतील मा. मुख्याध्यापक श्री. दिपक भास्कर तसेच मुरंबी आश्रमशाळेतील मुख्याध्यपिका श्रीम शीतल खंडे दोन्ही च्या मार्गदर्शनाखाली माता सरस्वती यांच्या प्रतिमेची पुजा करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रकाराच्या रानभाज्या बनवून आणल्या होत्या.या मध्ये एकुण 28 प्रकारची स्टॉल लावण्यात आले होते.
     या मध्ये आश्रमीय विद्यार्थी तसेच डेस्कालर विद्यार्थी यांनीही रानामधुन विविध प्रकारच्या रानभाज्या तसेच त्या रानभाज्या कश्या पद्धतीने तयार करतात यांची माहिती दिली.त्या रानभाज्या कोणत्या ठिकाणी सापडत तसेच त्या रानभाज्या खाल्यामुळे कोणत्या प्रकारचे खनिजे आपणास मिळतात. तसेच त्या रानभाज्या खाल्यामुळे कोणत्या रोग आपणास होत नाही यांची माहिती विद्यार्थी यांनी आलेल्या पाहुण्यांना माहिती दिली.रानभाज्या ची विक्री करीत असतात विद्यार्थीना बाजारपेठ मधील व्यवहार नफा तोटा इत्यादी घटकांचा सहज अभ्यास झाला.एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या रानभाज्या खाण्यासाठी विद्यार्थी तसेच शिक्षक यांनी योग आला.
      या मध्ये अंबाडी,तेरा,वास्ता,खुरसणी,तांदुळजिरा,माठ भाजी,कवदर, पेढरा,मोहठ्या भाजी,तेरा चि पातवड,लोती भाजी,आक्रा चि भाजी,उळीद दाळ,भोकोरले,आंळिब,कुळिद चे बेसन, तसेच नागली भाकरी तांदूळाची भागरी बाजरी ची भाकरी, असे विविध प्रकाराच्या रानभाज्या आणि विविध पदार्थ खाण्यचा आनंद खवय्ये यांना मिळाला.हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी दोन्ही शाळेतील शिक्षक तसेच अधीक्षक आणि अधिक्षक व बहुउद्देशीय कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने