महाराष्ट्र ट्रायबल न्युज

"बिरसा मुंडा गाव विकास समिती बा-हे" सर्कलपाडा PRA उत्साहात पार पडला

सुरगाणा l कृष्णा पवार:- दि.8 रोजी बिरसा मुंडा गाव विकास समिती बाऱ्हे सर्कल पाडा ता. सुरगाणा जि.नाशिक येथे PRA कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी ग्रामस्थांनी व शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात स्वदेस चे प्रतिनिधी व शासकिय कर्मचारी सुर्यवंशी साहेब BDO, बागुल साहेब ABDO,ग्रामसेवक गायकवाड मॅडम ,सरपंच वैशाली देविदास गावित यांचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले या कार्यक्रमासाठी स्वदेस अधिकारी वर्ग, तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
     कार्यक्रमाचे उद्घाटन गावचे सरपंच वैशाली ताई ,यांच्या हातून रुक्ष रोपण करून त्यांच्या हस्ते फित कापून सुरुवात करण्यात आले प्रभात फेरी काढून,नाचत गाजत सर्कल पाडा येथे विविध आदिवासी समाजाचे देखावे पाहत मारुती मंदिर येथे सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन बैठक घेण्यात आली. लोकांना जागृत करून कार्यक्रमाचा संदेश दिला. स्वच्छ, सुंदर, स्वास्थ, साक्षर समृद्ध या पाच घटकांच्या विकासातून एक स्वप्नातील गाव किंवा आदर्श गाव कशा पद्धतीने घडविता येईल या विषयावर तालुका व्यवस्थापक श्री दीपकजी गिऱ्हे साहेब यांनी गावाकऱ्यांसोबत चर्चा करून पुढील कार्यक्रम व उपक्रमाची रूपरेषा थोडक्यात समजून सांगितली. 
तसेच महिलांची FGD दीपक मोरे साहेब, आणि मुरली कासार साहेब यांनी घेतली. युवक यांची FGD राजेंद्र गुंड साहेब आणि अरुण सुबर , तुकाराम बोरसे सर यांनी घेतली. शाळा व्यवस्थापन समिती चे FGD तुषार आऱ्हे सर, सर यांनी घेतली , किशोरवयीन मुलींची मीटिंग कल्पना महाले मॅडम , डॉ अविनाश नाईक सर यांनी घेतली. शिवार फेरी सादिक पटेल सर आणि प्रवीण देशमुख,रोहिदास भांगरे सर यांनी केली.कार्यक्रमाचे सूत्र संचालन महाले सर यांनी केले व अनुमोदन खांबाईत सर यांनी केले.तसेच कार्यक्रमाचे फोटो व व्हिडीओ काढण्याचे काम गावातील तरुण मित्र मंडळ यांनी केले याप्रमाणे पहिल्या दिवशी चां कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम यशस्वीरित्या परिपूर्ण पार पाडण्यासाठी गाव विकास समिती मधील सर्व सदस्य उप समित्या यांनी नियोजन केले 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने