maharashtratribalnews

देव घराच्या खाली खड्डा खोदून लपविलेल्या देशी दारूच्या बाटल्या सापडल्या

वणी l प्रतिनिधी :- देव घराच्या खाली खड्डा खोदून लपविलेल्या देशी दारूच्या बाटल्या वणी पोलिसांनी शोधून काढल्या असून त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. कोल्हेर येथे दारू विक्री केली जात असल्याची तक्रार स्थानिकांनी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे केली होती. त्याच अनुषंगाने नुकतीच नेमणूक झालेल्या वणी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोल्हेर येथे साहेबराव रामदास पिठे वय ४८ रा. कोल्हेर , ता. दिंडोरी यांचे राहत्या घराची झडती घेतली असता यात देव्हार्‍याच्या खाली खड्डा खोदून ठेवण्यात आलेल्या प्रिन्स संत्रा नावाच्या ६० सिलबंद बाटल्या ४८००/- रुपये किमतीची देशी दारू मिळून आली. स.पो.नि. गायत्री जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत असून वणी पोलिसांनी साहेबराव रामदास पिठे यांच्याविरुद्ध महा. दारू बंदी कायदा कलम ६५ ( ई ) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास वणी पोलीस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने