दिंडोरी - मनोज पाटील
दिंडोरी तालुक्यातील नळवाडपाडा येथे घराच्या छताचे लोखंडी पाईप ला शिकार पंप बांधन्यास गेलेल्या शेतकरी युवकांस त्या पाईप मध्ये विजप्रवाह उतरला असल्याने चिकटला असता त्यास वाचविण्यास गेलेली पत्नीस ही विजेचा धक्का बसून युवा दांपत्य शेतकरी मयत झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की नळवाडपाडा येथील साहेबराव चंदर महाले वय 29 हे वस्तीवर राहतात गेल्या पंधरा दिवसापासून सातत्याने पाऊस सुरु असून गुरुवारी सकाळी आठ चे सुमारास झालेल्या पावसाचे वेळी ते आपल्या घराचे पडवीचे छताचे लोखंडी पाईप ला शिकार पंप बांधण्यास गेले असता सदर पाईप मध्ये वीज प्रवाह उतरलेला होता त्या विजेचा धक्का त्यास बसला हे बघतच त्यांची पत्नी राणी वय 25 ही त्यांना वाचवण्यास गेली असता तिला ही शॉक बसला नातेवाईकांनी त्यांना तात्काळ दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. पावसामुळे घराची पडवी पूर्ण ओली असल्याने विजेचा तीव्र शॉक बसत त्यांना वाचण्याची संधी मिळाली नाही. सदर महिला सात महिन्याची गर्भवती माता होती यात ते बालक ही मातेच्या गर्भात आईसोबत मयत झाले. पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान होत असताना पिकांवर रोग प्रारदुर्भाव टाळण्यासाठी शिकार पंप पाठीवर घेत फवारणी करणारे युवा दाम्पत्य शिकार पंप सुरक्षित ठिकाणी ठेवण्यास गेले अन दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे पश्चात आई ,भाऊ,एक चार वर्षाची तर एक अडीच वर्षाची मुलगी आहे.
*आजी पप्पा मम्मी कधी येणार*
या घटनेनंतर दोघांनाही दिंडोरी दवाखान्यात नेत्यात आले यावेळी चिमुकल्यांना सांगितले की पप्पा मम्मी दिंडोरीला गेले येतील आज पंचनामा करण्यासाठी तलाठी ग्रामसेवक वीज कर्मचारी आले त्यावेळी चिमुकल्यांना वाटले आपले पप्पा मम्मी आले पण त्या गाडीत ते दिसले नाही चिमुकल्यांनी आजी ला विचारले पप्पा मम्मी कधी येणार हे ऐकताच सर्वांना गहिवरून येत सर्वांचेच डोळे पानावले.