खोकरविहीर l प्रतिनिधी:- अतिदुर्गम भागात रोजच्या पाण्यासाठी महिलांना करावी लागणारी पायपीट आणि डोक्यावरील पाण्याचा भार कमी करण्यासाठी, सुरगाणा तालुक्यातील खिर्डी या गावात रविवारी (१२ एप्रिल २०२६) 'मिशन हर घर जल' अंतर्गत एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात परिसरातील महिलांना २०० निळ्या रंगाचे वॉटर रोलर ड्रम्स मोफत वाटप करून मोठा दिलासा देण्यात आला आहे.
या मोहिमेमुळे लांब अंतरावरून पाणी आणताना होणारा महिलांचा शारीरिक त्रास कमी होण्यास मदत होणार आहे. खिर्डी परिसरातील ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.
या उपक्रमाचे आयोजन दरवर्षी विविध ठिकाणी खालील संस्थांकडून एकत्रितपणे केले जाते त्यात रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थ चे अध्यक्ष आशिष चांडक, सचिव अनिल साखरे , प्रोजेक्ट कोर्डीनेटर नरेंद्र महाले, कपिल पाटिल, स्वयंशक्ती स्त्री उद्यमी फाउंडेशन च्या अध्यक्षा दीपाली चांडक, उपाध्यक्षा शाल्मली शेट्टी तसेच इनरव्हील क्लब ऑफ जेन-नेक्स्ट नाशिक अध्यक्षा रमा वर्मा आणि सचिव अंकिता पाटील.
या वर्षी ह्या उपक्रमासाठी विवि्ध संस्थांचे जसे इनरव्हील क्लब ऑफ ठाणे शायनिंग स्टार, रोटरी क्लब ऑफ नाशिक नेक्सस, रोटरी क्लब ऑफ नाशिक स्मार्टसिटी, रोटरी क्लब ऑफ नाशिक एअरपोर्ट, एलिट इंटिरिअर्स आणि पेंटो डिझाइन् यांचे सहकार्य लाभले.
इनरव्हील क्लब ऑफ ठाणे शायनिंग स्टार्स च्या अध्यक्षा गुलशन भाटिया, सीसी भक्ती कपाडिया आणि पीपी मंजिरी देशपांडे यांच्या आणि जिग्नेश गांधी यांच्या देणगीतून तिथे २०० महिलांना चपलांचे चे वाटप करण्यात आले.
रोटरॅक्ट क्लब एमजीव्ही (MGV) चे अध्यक्ष मयंक शुक्ला, सचिव दुर्गेश चित्ते. आणि त्यांच्या टिम ने त्यांच्या वरिष्ठ डॅा वैभवी थोरात, डॅा निशा भावसार यांच्या सहाय्याने ४०० हून अधिक ग्रामस्था्साठी आरोग्य शिबिर आयोजित केले तसेच तिथे CPR वर मार्गदर्शन करण्यात आले.
डॉ. रघुनाथ भोये, सेवानिवृत्त अतिरिक्त आरोग्य संचालक, सौ. भारतीताई भोये, सामाजिक कार्यकर्त्या, गट शिक्षण अधिकारी राजदादा आहेर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
श्री. देविदास कामडी यांचे आणि यांच्या संपुर्ण जलजीवन परिषद टिम चे या उपक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले. खिर्डी जलपरिषद मित्र परिवार आणि खिर्डी जलपरिषद महिला परिवार यांचे पदाधिकारी देखील या आयोजनात सक्रिय सहभागी होते. या कार्यक्रमास अनेक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून मोहिमेला बळ दिले: अनुपमा शेवाळे, स्वाती चव्हाण, भावेश पटेल, राजेंद्र धारणकर, संदीप खताळे, लोकेश लाड, कुशल मेढे, प्रशांत सारडा, रश्मी व राजेश कदम, पुजा छाजेड, विद्या साखरे, शिल्पा शेट्टी, अर्चना शिरसाठ, मुकेश व भावना आचरा, मुग्धा नागपूरकर, भारती पगार, स्नेहल सोनकुळे, यांची विशेष उपस्थिती होती.