बा-हे - नामदेव पाडवी :- महाराष्ट्र राज्यातील डांग, सुरगाणा, पेठ, कळवण, दिंडोरी, हरसुल, त्र्यंबकेश्वर, जव्हार, मोखाडा, पालघर सीमावर्ती भागातील आदिवासी बांधव आजही अनेक सण, समारंभ, उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे करण्यात स्वारस्य दाखवतात. यापैकीच अक्षय तृतीया हा सण या आदिवासी बहुल भागात अनेक वर्षांपासून आखाती गौराई म्हणून सण साजरा केला जातो. या सण उत्सवाला सुरुवात जून महिन्यात होते. तेरा हा पहिला सण जून महिन्यात प्रथम साजरा केला जातो. त्यानंतर सणांची मालिकाच सुरु होते.
नदीवरुन येताना महिला बेडूक, बेडकी, फेदरा (शेवाळ) आदी वस्तू गौराई विसर्जन ठिकाणाहून लपवून आणतात. त्या सार्वजनिक ठिकाणी आणल्यावर पुरुषांना नेमके काय आणले, हे ओळखण्यास सांगितले जाते. त्याला जिखणे असे म्हणतात. तर दुसरीकडे पुरुष याच ठिकाणी एका झिल्याखाली एखादा लहान मुलगा ठेवतात. त्याचे नाव ओळखायला सांगतात. शेतीच्या कामाच्या वस्तू फाळ, असू, कासरा, खोडगी, घरटी, विळा या वस्तू झाकून ठेवतात. त्या महिलांना ओळखण्यासाठी सांगितले जाते. जर नेमके ओळखता आले नाही, तर महिला झुंडशाही करीत झाकलेला झिला उचलून धरतात. या निमित्ताने मातेचा नैवेद्य दाखविला जातो. शेण टाकतात ती जागा म्हणजे 'गवर' यावर पाच मुलांना जेवायला बसवितात त्यांना भात, मासे, दाळ, नागलीच्या भाकरीचे जेवण दिले जाते. भुत्या म्हणजे चक्रीवादळ, वावटळ याची पुजा केली जाते. अशा पद्धतीने हा गौराई सण उत्साहाने साजरा केला जातो. याला शेवटचा ‘बुडीत’सण असे म्हटले जाते. पेरलेले बियाणे उगवण होण्यास योग्य आहे की कमजोर, याची परीक्षा करतात.
गाणी…गौराईची
सिता पाटी, माती भरवं.. बाई…
येळू, शेळू पिरवं.. दाणा बाई पिरवं.. दाणा…
दाणा बाई शिपावं.. दाणा. ये ही दाणाला एक सुळा फुट बाई.. एक सुळा…
ये ही दाणाला एक पान फुट बाई एक पान