महाराष्ट्र ट्रायबल न्युज

*बोहाडा उत्सव कमिटी बाऱ्हे यांच्या कडून पोलीस पाटलांना जॅकेटचे वाटप*

बाऱ्हे l नामदेव पाडवी:- नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून पालघर जिल्ह्यातील गाव कामगार पोलीस पाटलांना जॅकेटचे वाटप करण्यात आले होते. त्याअनुषंगाने 21 एप्रिल 2026 ते 23 एप्रिल 2026 पर्यंत चालणाऱ्या तीन दिवसीय आदिवासी बोहाडा महोत्सव निमित्ताने पोलीस पाटलांनी बाऱ्हे पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरिक्षक प्रदीप गीते यांच्याकडे जॅकेटची मागणी केली असता ग्रुप ग्रामपंचायत व ग्रामदैवत श्री जगदंबा माता बोहाडा उत्सव समिती बा-हे यांच्या सौजन्याने स्थानिक पोलीस पाटलांना जॅकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी बा-हे पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक प्रदीप गीते, बोहाडा समितीचे सुरेश वार्डे, देविदास गावीत, पोलीस पाटील संघटनेचे हंसराज खंबाईत, गोपनीय कक्ष अधिकारी कैलास इंपाळ यांच्यासह पोलीस पाटील उपस्थित होते.
       ग्राम सुरक्षा आणि पोलिसांशी समन्वय राखण्यासाठी ही अत्यंत स्तुत्य बाब आहे.रात्रगस्त किंवा ग्राम सुरक्षेच्या कामात पोलीस पाटलांना सुविधा व्हावी. पोलीस पाटील हे गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यात आणि पोलिसांना माहिती पुरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.अशा प्रकारच्या प्रयत्नांमुळे पोलीस पाटील व ग्रामस्थ यांच्यातील समन्वय अधिक बळकट होईल असा यामागचा प्रमुख उद्देश आहे. पोलीस पाटलांनी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, सहा. पोलीस निरीक्षक प्रदीप गीते, ग्रुप ग्रामपंचायत सरपंच, सदस्य तसेच बोहाडा उत्सव समिती बा-हे यांचे विशेष आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने