खोकरविहिर l प्रतिनिधी:- त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल जवळ असलेल्या जि. प. शाळा बोरिपाडा येथे इनर विल क्लब ऑफ जन नेक्स्ट नाशिक
तर्फे वर्ष २०२५–२६ अंतर्गत ३ किलोवॅट क्षमतेचा मेगा सोलर प्रोजेक्ट यशस्वीरित्या राबविण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वच्छ, शाश्वत आणि अखंडित ऊर्जा उपलब्ध करून देत आधुनिक शिक्षणाची सुविधा मिळावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
या प्रकल्पांतर्गत शाळेमध्ये ६ सोलर पॅनेल, प्रत्येकी १ किलोवॅटचे ३ इन्व्हर्टर, संपूर्ण स्ट्रक्चर, वायरिंग व इंस्टॉलेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. सुमारे
रु. १, १३९१३/-खर्चाच्या या प्रकल्पाचा लाभ २५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना होणार असून आता शाळेतील स्मार्ट टीव्ही, प्रोजेक्टर, पंखे व दिवे सौर उर्जेवर सुरळीत चालणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगले व आधुनिक शैक्षणिक वातावरण मिळणार आहे.
या उपक्रमासोबतच क्लबतर्फे विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसत होता विध्यार्थीना शिक्षणाला प्रोत्साहन मिळाले आहे.
कार्यक्रमावेळी क्लबच्या अध्यक्षा रमा वर्मा यांनी सांगितले की, “हा सोलर प्रोजेक्ट केवळ एक सुविधा नसून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशेचा प्रकाश आहे. एकत्रितपणे काम केल्यास समाजात सकारात्मक बदल घडवता येतो आणि आजचा हा उपक्रम त्याचे उत्तम उदाहरण आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, या संपूर्ण प्रकल्पात रोटेरियन मिस्टर आर. के. वर्मा
यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. त्यांच्या पाठिंब्यामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पूर्ण झाला.
क्लबतर्फे सौरयुथ रेनिवबल्स अँड इन्फ्रा प्रोजेक्ट्स एलएलपी चे सिईओ युगेंद्रजी तुपे
यांचे ग्रामीण विकास, सौर ऊर्जा जनजागृती, पर्यावरण संवर्धन आणि गरजू विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिलेल्या अमूल्य सहकार्य उदार योगदान, सामाजिक बांधिलकी व सततच्या पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. त्यांच्या या प्रेरणादायी सहकार्यामुळे ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा मिळण्यास मोठी मदत झाली असून हा उपक्रम समाजासाठी एक आदर्श उदाहरण ठरला आहे शिक्षणासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल विशेष आभार व्यक्त करण्यात आले. त्यांच्या योगदानामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा उपलब्ध होण्यास मोठी मदत झाली आहे.
कार्यक्रमामध्ये पारंपरिक आदिवासी नृत्य व सामुदायिक भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण वातावरण सांस्कृतिक उत्साहाने भारावून गेले.
या कार्यक्रमास पास्ट प्रेसिडेंट माधुरी महाजन, प्रियांका समुद्रा,
कांचन भूतडा, रुही, रोटेरियन आर. के. वर्मा,
सौर रेनेवेबल्स
अँड इन्फ्रा प्रोजेक्ट्स एलएलपी चे प्रतिनिधी अमित वर्मा,
बोरिपाडा गावचे सरपंच पल्हाद बोरसे , पोलीस पाटील रवींद्र पवार,जलपरिषदचे नारायण गभाले, प्रसाद बोडस, दिपक भोये, ज्ञानेश्वर गावित,देविदास कामडी,
शाळेचे मुख्याध्यापक पूर्णानंद गावित सर,मनीषा पवार, बायजाबाई कडू,जाणू भडांगे, हिरामण चौधरी,मोहनदास बोरसे, मनोहर पवार, काळू वड, सुभाष पवार, अनुसया पवार, संगीता राऊतमाळे
शिक्षक देविदास घुलूम सर, तुकाराम निंबारे सर,सुभाष महाले सर,बबन चव्हाण सर
शाळेतील विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“सौर उर्जेकडे टाकलेले छोटे पाऊल भविष्यात मोठा बदल घडवू शकते,” हा संदेश देत हा उपक्रम ग्रामीण विकास आणि पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरणादायी ठरला आहे.