महाराष्ट्र ट्रायबल न्युज

दिंडोरी तालुक्यात 10 गावांत ‘जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन’ उत्साहात साजरा

दिंडोरी l प्रतिनिधी: पर्नोड रिकार्ड इंडिया फौंडेशन यांच्या आर्थिक सहाय्याने व इकोसॅन सर्व्हिसेस फौंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी, निलवंडी, पालखेड बंधारा, वलखेड, करंजवण, उमराळे खुर्द, नळवाडी, पाडे, अवनखेड आणि आशेवाडी या 10 गावांमध्ये 28 मे रोजी ‘जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन’ (World Menstrual Hygiene Day) उत्साहात व जनजागृतीपर उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला.

या दिनानिमित्त मुली आणि महिलांच्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापनाबाबत विविध उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये जनजागृती फेरी, रेड बलून ॲक्टिव्हिटी, प्रश्नमंजुषा स्पर्धा, मासिक पाळी व्यवस्थापनाची माहिती, सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप आणि मासिक पाळी दरम्यान घ्यावयाच्या काळजीबाबत इकोसॅन सर्व्हिसेस फौंडेशन च्या टीम कडून सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचा मुख्य उद्देश: विद्यार्थिनी व महिलांमध्ये मासिक पाळीबाबत असलेले गैरसमज, अंधश्रद्धा दूर करणे आणि मासिक पाळी स्वच्छता व आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करणे हा होता.

मासिक पाळी ही स्त्रीच्या शरीरातील अत्यंत नैसर्गिक आणि जैविक प्रक्रिया असूनही, आजही ग्रामीण व निमशहरी भागात तिच्याबाबत लाज, संकोच आणि अनेक चुकीच्या समजुती दिसून येतात. या पार्श्वभूमीवर ‘पाळी आली म्हणजे लाजायचे नाही, तर समजून घ्यायचे’ हा संदेश देण्यात आला. 

कार्यक्रमास महिलां, किशोरवयीन मुली,आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, सी आर पी, व एकूण ५२८ महिला व मुली मोठ्या संख्येने या जनजागृतीस उपस्थित होत्या.
तसेच यासाठी इकोसॅन सर्विसेस फॉउंडेशन यांचे वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक आदित्य भेडसगावकर, तसेच प्रकल्प व्यवस्थापक सानिका घळसासी यांचे मार्गदर्शन मिळाले व त्यावेळी त्यांचा फील्ड स्टाफ तृप्ती पाटील, ओम डोकफोडे, गायत्री चव्हाण व सुमेध मोरे यांनी वेग वेगळ्या विविध उपक्रमद्वारे या गावामध्ये मसिक पाळी दिवस बाबत जनजागृती केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने