निळवंडी येथे मंदिर जिर्णोद्धार वर्धापन दिन व अखंड हरिनाम सप्ताह मंगळवार दि. 23 रोजी ते मंगळवार दि. 30 जून 2026 रोजी या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पहाटे 4 ते 6 काकडा, सकाळी 10 ते 12 गाथा भजन, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, रात्री 8.30 ते 10.30 वा. हरिकिर्तन होणार आहे. मंगळवार दि. 23 रोजी एकनाथ महाराज गोळेसर (कुंदेवाडी), बुधवार दि. 24 रोजी साहिल महाराज पाटील (आळंदी), गुरुवार दि. 25 रोजी एकनाथ महाराज चतरशास्त्री (परभणी), शुक्रवार दि. 26 रोजी अमृत महाराज जोशी (बीड), शनिवार दि. 27 रोजी विश्वनाथ महाराज वारिंगे (मुक्ताई ज्ञानपीठ अंबरनाथ), रविवार दि. 28 रोजी कृष्णा महाराज चवरे (पंढरपूर), सोमवार दि. 29 रोजी अनिल महाराज पाटील (बार्शीकर), याच दिवशी दुपारी 4 वाजता दिंडी, प्रदशिणा सोहळा होणार आहे. मंगळवार दि. 30 रोजी सकाळी 9 ते 11 यावेळेत मुक्ताईदासानुदास तुकाराम महाराज मेहुणकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद देवून सप्ताहाची सांगता होणार आहे. तरी या अखंड हरिनाम सप्ताहाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भजनी मंडळ, ग्रामस्थांनी केले आहे.