महाराष्ट्र ट्रायबल न्युज

मोहपाडा येथे दिव्यांग विद्यार्थी माता,पालक मेळावा संपन्न

बाऱ्हे - नामदेव पाडवी :- दिव्यांग विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासात पालकांची, विशेषतः मातांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.पालकांमधील संवाद वाढवण्यासाठी तसेच मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी दिनांक 22/6/2026 वार सोमवार रोजी मोहपाडा येथे केंद्रस्तरीय दिव्यांग विद्यार्थी माता पालक मेळावा सकाळी 11:00 ते दुपारी 1:00 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यात विद्यार्थी आधारकार्ड, रेशनकार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र याबरोबर विद्यार्थांना मिळणाऱ्या योजना मदतनीस, प्रोत्साहन, वाचक, वाहनभत्ता याविषयी विशेष शिक्षक नितीन पठाडे यांनी तर शैक्षणिक प्रगती, आरोग्य आणि स्वच्छता, मोबाईलचा अतिवापर आणि पालकांचा सहभाग या विषयावर सहशिक्षिका नम्रता टोपले, अश्विनी भोये, स्मिता भुसारे यांनी मार्गदर्शन केले. पालकांच्या शंकांचे निरसन करून अभिप्राय घेण्यात आले. अतिशय उत्साहात मेळावा घेण्यात आला. मुख्याध्यापक दत्तू कांबळे, ज्येष्ठ शिक्षक फसाळे यांच्यासह पालक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने