महाराष्ट्र ट्रायबल न्युज

पल्स पोलिओ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद; ‘आपला दवाखाना’ येथे बालकांना डोस

दिंडोरी l प्रतिनिधी:- देशभरात राबवल्या जाणार्‍या पल्स पोलिओ मोहिमेतंर्गत आज दिंडोरी शहरात बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस पाजण्यात आली. येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ येथे या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला असून, परिसरातील नागरिकांनी आपल्या लहान बालकांना लस देण्यासाठी सकाळपासूनच केंद्रावर गर्दी केली होती. त्यामुळे या मोहिमेला दिंडोरीत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे पाहायला मिळाले.
शून्य ते पाच वर्ष वयोगटातील एकही बालक पोलिओ डोसपासून वंचित राहू नये, या उद्देशाने आरोग्य विभागाने चोख नियोजन केले होते. या मोहिमेप्रसंगी शासकीय जन आरोग्य समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक नितीन गांगुर्डे, प्रामुख्याने उपस्थित होते. नितीन गांगुर्डे यांनी उपस्थित पालकांशी संवाद साधत, पोलिओ निर्मूलनासाठी प्रत्येकाने जागरूक राहून आपल्या मुलांना डोस पाजण्याचे आवाहन केले. ‘आपला दवाखाना’ केंद्रामध्ये आलेल्या बालकांना अंगणवाडी सेविका अर्चना कडलग आणि आरोग्य सेवक अतुल अहिरे यांनी पोलिओचे थेंब (दोन थेंब आयुष्याचे) पाजले. तसेच पालकांना बालकांच्या आरोग्याविषयी आणि पुढील लसीकरणाविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. युवराज देवरे, डॉ. प्रिया गिरी, वैशाली चव्हाण, महेंद्र कंडलकर, पल्लवी धीवंडे, कांचन सुर्यवंशी, प्रियंका सवई, देवयानी शिरसाठ, रागिणी परदेशी, धनधी राऊत, संजय भांड, अतूल अहिरे, सचिन देशमुख, प्रदीप देशमुख आदींसह आरोग्य विभागाचे इतर कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी मदतनीस आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोहिमेच्या पूर्वतयारीमुळे आणि कर्मचार्‍यांच्या सातत्यपूर्ण संपर्कामुळे पहिल्याच दिवशी बहुतांश बालकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. जो भाग सुटला असेल, तिथे गृही भेटी देऊन उर्वरित बालकांना डोस दिला जाईल, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.

*प्रतिक्रिया*
*देशातून पोलिओचे पूर्णपणे उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक बालकाला ही लस मिळणे गरजेचे आहे. दिंडोरीतील प्रत्येक नागरिकाने यात सहभाग नोंदवून मोहीम यशस्वी करावी.- नितीन गांगुर्डे (अध्यक्ष, शासकीय जन आरोग्य समिती )*

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने