मुख्य संपादक l मनोज पाटील
निळवंडी । दिंडोरी तालुक्यातील निळवंडी व पाडे या दोन्ही गावांना आठ तास थी्र फेज वीज पुरवठा देण्यात यावा, याबाबत शेतकर्यांच्या वतीने वीज महावितरण अधिकारी दिंडोरी यांना निवेदनव्दारे केली आहे. सध्या उन्ंहाळ्याचे दिवस असल्याने शेतीपिकांना पाणी आवश्यक असते. निळवंडी, पाडे परिसरात द्राक्षबागायतदार म्हणून ओळखला जातो. त्याचप्रमाणे या भागात मोठ्या प्रमाणात भाजीपाला केला जातो. यामुळे उन्हाळ्यात शेतीपिकांना पाण्याची मोठ्या प्रमाणात गरज भासते. 5 तास थी्र फेज वीज पुरवठा सुरु आहे. तसेच इतर सर्व फिडरला 8 तास सुरळीत वीज पुरवठा सुरु आहे. तरी पाडे व निळवंडी विभागाला 8 तास थी्र फेज वीज पुरवठा मिळावा अन्यथा पुढील 8 तास थी्र फेज वीज पुरवठा मिळाली नाही तर शेतकर्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. अगोदर पाच तास थी्र फेज वीज होती, निवेदन दिल्यानंतर 6 तास करण्यात आली व काही दिवसातच आठ तास थी्र फेज वीज पुरवठा देण्यात येर्त्तल, असे वीज महावितरण कंपनीच्या अधिकार्यांनी सांगितले. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक जिल्हा कार्याध्यक्ष नीलेश पेलमहाले, सोमनाथ नाठे, पवन बोस्ते आदींसह निळवंडी, पाडे येथील शेतकरी उपस्थित होते.