हरसूल : वार्ताहर
नाशिक जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागातर्फे खैरायपाली ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दिपक लहारे यांना नुकताच 'आदर्श ग्रामपंचायत अधिकारी' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.या पुरस्काराबद्दल सरपंच सविता पवार, उपसरपंच रमेश लांघे, ग्रा. सदस्य महादू पवार यांच्यासह ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम भागातील खैरायपाली येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दिपक लहारे यांना सन 2023/24 या आर्थिक वर्षात शासनाच्या विविध योजनाची अंमलबजावणी यशस्वीपणे करून ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे राहणीमान उंचावून सर्वोत्कृष्ठ व उल्लेखनीय कामगिरी केली असल्याची दखल घेऊन नाशिक जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातर्फे सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या पुरस्काराबद्दल सरपंच सविता पवार, उपसरपंच रमेश लांघे,ग्राम.पं. सदस्य महादू पवार,सामाजिक कार्यकर्ते मारुती पवार, देवराम शुगर, रंजना चौधरी,लता पवार, राधाबाई पवार,यमुनाबाई गोतरणे,पवन भोये, दशरथ शिंगाडे,लक्ष्मण गोतरणे, प्रकाश अवतार,रमेश पवार,भगवान शिंगाडे,रमेश शिंगाडे,भागवत लांघे,भिका लोखंडे,गुलाब शिंगाडे,रावजी गोतरणे आदीसह ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला.