महाराष्ट्र ट्रायबल न्युज

रॅबीज लस उपलब्ध करा : नगरसेवक नितीन गांगुर्डे

दिंडोरी l प्रतिनिधी :- दिंडोरी शहरात सध्या रॅबीज लसीचा तुटवडा जाणवत असुन रुग्णांना थेट रॅबिज लसीसाठी नाशिक येथेच जावे लागत आहे. आरोग्य विभागाने ग्रामीण रुग्णालयात तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये श्‍वान दंश विरोधी रॅबीज लस उपलब्ध करावी, अशी मागणी दिंडोरी नगरपंचायतीचे नगरसेवक नितीन गांगुर्डे यांनी केली आहे.
    दिंडोरी शहरात भटक्या श्‍वानांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बिबट्यांचा वावर जंगलातुन दिंडोरी लगतच्या भागात आहेत. त्यामुळे दिंडोरीकर अगोदरच दहशतीत आहे. पण आता भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्यंा प्रमाणात असल्याने त्यांचे नागरिकांवरील हल्ल्याचे प्रमाण सुध्दा वाढले आहे. विशेषत: लहान मुलांवर कुत्रे हल्ले करीत आहे. प्रत्येक प्रभागात कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. त्यात अनेक ठिकाणी पिसाळलेल्या कुत्र्याने अनेक नागरिकांना चावा घेतला आहे.त्यावेळी ते दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात गेले असता त्यांना लस मिळाली नाही. तालुक्यातील इतर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुदधा लस उपलब्ध नव्हती.त्यांना सर्वांना नाशिकला जावे लागले.आता इंदिरानगर येथे सुध्दा पिसाळलेले कुत्रे फिरत होते. नागरिकांनी त्याबाबत तक्रारी केल्या आहेत. दिंडोरी शहरात आणि तालुक्यात रॅबिज लसीच्या तुटवड्यामुळे रुग्णांना नाशिक येथे धाव घ्यावे लागत आहे.हा खर्च सर्वसामान्यं नागरिकांना न परवडणारा आहेे.या शिवाय वेळेवर नाशिकला शोेधाशोधही करावी लागते.रॅबिज लसीचा गेल्या वर्षभरात अनेक वेळा तुटवडा भासलेला आहे. इतरही अनेक औषधे उपलब्ध नसतात.दिंडोरी येथील गांधी नगरातील आपला दवाखाना येथेही औषधांचा तुटवडा असुन तीन महिन्यांपासुन वैद्यकिय अधिकारी सुध्दा मिळत नाही. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. या सर्व पार्श्‍वभुमिवर शासनाच्या आरोेग्य विभागाने तातडीने ग्रामीण भागात औषध पुरवठा वाढवुन रॅबिज लस उपलब्ध करावी तसेच वैदयकिय सेवा सुधारावी, अशी मागणी दिंडोरी नगरपंचायतीचे नगरसेवक नितीन गांगुर्डे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने