दिंडोरी -दिंडोरी क्रुषी उत्पन्न बाजार समितीच्या दिंडोरी येथील मुख्य आवारात गुढिपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कांदा लिलाव व स्वच्छता अभियानाचा शुभारंभ खासदार भास्कर भगरे यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी झालेल्या पहिल्याच लिलावात 3200 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला, पहिल्याच दिवशी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणला होता, यावेळी राज्य सरकारने ठरवुन दिलेल्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत स्वछता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला, खासदार भास्कर भगरे यांनी संसदेत कांद्यावरील निर्यात शुल्क हटविण्याची मागणी केली होती त्यानुसार केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क हटविले त्याबद्दल खासदार भगरेंचा बाजार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला, याप्रसंगी
बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, उपसभापती योगेश बर्डे, संचालक कैलास मवाळ, गंगाधर निखाडे, पांडुरंग गडकरी,दत्तु भेरे, श्याम बोडके, अमित चोरडिया, नंदलाल चोपडा,सूरेश डोखळे, विलास कड, शेखर देशमुख,दत्तु राऊत,दत्तु शिंगाडे, विठ्ठलराव अपसुंदे, डॉक्टर योगेश गोसावी, सहाय्यक निबंधक वैभव मोरडे, नाना मोरे, शहाजी सोमवंशी, गोपीनाथ पाटील, गुलाब जाधव, महेंद्र बोरा आदींसह शेतकरी व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाजार समितीचे सचिव जे के जाधव यांच्यासह कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले,