संपादक l कृष्णा पवार
बोरगाव | संविधान हक्क परिषदेच्यावतीने यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित संविधान गौरव सोहळ्यात सुरगाणा पंचायत समितीच्या माजी सभापती मंदाकिनी भोये यांना सन्मानित करण्यात आले. प्रमुख पाहुणे शरद पवार, चंद्रकांत हांडोरे, मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते गौरवण्यात आला. या प्रतिष्ठित पुरस्काराच्या निमित्ताने श्रीमती भोये यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या समाजहिताच्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास अनेक प्रतिष्ठित व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. या सन्मानाने त्यांच्या कार्याची महती अधोरेखित झाली. याप्रसंगी सरपंच मनिषा महाले, संजाबाई खंबाईत, रंजना चौधरी, प्रतिभा गांगुर्डे यांनी अभिनंदन केले.