महाराष्ट्र ट्रायबल न्युज

मोहाडी देवराईस शिवमहापुराण कथाकार यांची भेट व वृक्षारोपण

मुख्य संपादक l मनोज पाटील 
मोहाडी ता.20: मोहाडी (ता.दिंडोरी) येथे शिवमहापुराण कथा सुरू असून कथाकार विजय महाराज आर्दड (बीड ) यांनी सहकाऱ्यांसह सह्याद्री गोपालकृष्ण देवराईस भेट देऊन वृक्ष लागवड केली. 
झाडांची वाढ,वृक्ष लागवड करतांना देशी वृक्ष व जैवविविधतेची घेतलेली काळजी,वृक्ष संवर्धनाचे नियोजन, ग्रामस्थांच्या सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणी चिरंतन स्मृती जपत असताना वृक्ष लागवड करून सतत ठेवलेली जाणीव जागृती व सातत्य, वृक्षारोपण कार्यक्रमाची सातत्याने व्यापक प्रसिद्धी,ग्रामस्थांचा आर्थिक सहभाग याबद्दल माहिती घेतली
व मोहाडी नगरीत सु-विचार व झाड दोघेही असेच उंच उंच वाढीस लागत आहेत जी काळाची गरज आहे याबद्दल समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी शिवमहापुराण कथाकार विजय महाराज आर्दड (बीड), सुभाष महाराज बीडकर, साहेबराव महाराज कवडेकर (आळंदी), साईनाथ महाराज नांदेडकर यांनी बेलाचे रोपटे लागवड केले.
समवेत शिवमहापुराण कथा सक्रिय आयोजक प्रवीण पाटील कु.यश सोमवंशी व देवराई सदस्य उपस्थित होते 

मोहाडी: देवराईत वृक्षारोपण करताना कथाकार विजय महाराज आर्दड आदी.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने