मोहाडी ता.19: कर्मयोगी एकनाथभाऊ जयराम जाधव यांच्या बाराव्या पुण्यस्मरणा निमित्ताने मोहाडी ता.दिंडोरी येथे एकनाथभाऊ जाधव फाउंडेशन च्या वतीने तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रथम दिवशी मविप्र सरचिटणीस नितीन ठाकरे, पदाधिकारी दिलीप दळवी,विश्वासराव मोरे,विजय पगार, अमित बोरसे,रमेश पिंगळे, संपतराव घडवजे,मविप्र शिक्षणाधिकारी डी.डी.जाधव,के.एस. शिंदे,शशिकांत मोगल, सरपंच आशा लहांगे, विकास सोसायटी अध्यक्ष कैलास कळमकर, उपसरपंच भाग्यश्री जाधव, प्राचार्य शरयू भामरे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्राचार्य माया वारूंगसे, मुख्याध्यापक राजेंद्र परदेशी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांसह शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकनाथभाऊ जाधव यांच्या जीवन कार्यावर मनोगत व्यक्त केले. संगीत शिक्षक डि. के.पागेरे व गीतमंचने स्वागत गीत सादर केले.यानंतर दिवसभर जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात जिल्ह्यातील अनेक भजनी मंडळांनी सहभाग घेतला. विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.स्पर्धेचे परीक्षण आनंद अत्रे व व्यंकटेश ढवन यांनी केले. दुसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध व्याख्याते अविनाश भारती यांचे बाप समजून घेताना......या विषयावर उद्बोधक व्याख्यान झाले. याप्रसंगी अविनाश भारती यांनी आपल्या ओघवत्या शैलीत बापाचे मुलांच्या आयुष्यातील व संपूर्ण कुटुंबातील महत्त्व विषद केले. याप्रसंगी माजी आमदार धनराज महाले, करंजवणचे सरपंच पप्पू मोरे सह मान्यवर उपस्थित होते.तर तिसऱ्या दिवशी कवी प्रा.लक्ष्मण महाडिक व कवी संदीप जगताप यांच्या उपस्थितीत कवी संमेलन पार पडले. याप्रसंगी मविप्र संचालक शिवाजी गडाख,नंदकुमार बनकर,शिवसेना नेते सुनील आवनखेडचे सरपंच नरेंद्र जाधव उपस्थित होते. तिन्ही दिवसाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउंडेशनचे अध्यक्ष तथा मविप्र शिक्षणाधिकारी प्रा. डॉ.विलास देशमुख, स्वागत अष्टबाहू गोपालकृष्ण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष उत्तमकाका जाधव व प्रदीप जाधव यांनी तर आभार मविप्र संचालक प्रवीण जाधव यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गोविंद बैरागी,तुषार गीते व ज्ञानेश्वर भवर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोहाडी ग्रामपंचायत,विकास सोसायटी,मविप्र परिवाराचे कर्मवीर रावसाहेब थोरात विद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्था,जिल्हा परिषद शाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व पदाधिकारी, गोपालकृष्ण देवस्थान विश्वस्त यासह कर्मयोगी एकनाथ भाऊ जाधव फाउंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
चौकट
जिल्हास्तरीय भजन स्पर्धेतील पहिले पारितोषिक रु.१५००० व सन्मान चिन्ह मल्हारी बाबा भजनी मंडळ कारसूळ वडाळी, द्वितीय पारितोषिक रु.११००० व सन्मान चिन्ह संत मुक्ता बाल भजनी मंडळ मराठा हायस्कूल,
तृतीय पारितोषिक रु.७००० व सन्मान चिन्ह रेणुका भजनी मंडळ चांदवड,
यांनी पटकावले.
तर उत्तेजनार्थ
प्रथम पारितोषिक रुपये ५००० व सन्मान चिन्ह ब्रह्मचित्त कमल भजनी मंडळ मनमाड ,
द्वितीय रु.२१०० व सन्मान चिन्ह कर्दम ऋषी भजनी मंडळ ओझरखेड,तृतीय रु.११०० व सन्मान चिन्ह महारुद्र भजनी मंडळ तिसगाव यांनी मिळवले.
मोहाडी: कर्मयोगी एकनाथ भाऊ जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करताना मविप्र सरचिटणीस नितीन ठाकरे व मान्यवर.
2) जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत प्रथम पारितोषिक स्वीकारताना कारसूळ वडाळीचे भजनी मंडळ.