महाराष्ट्र ट्रायबल न्युज

अक्राळे शाळेत शाळा व्यवस्थापन समितीची बैठक उत्साहात संपन्न

दिंडोरी - प्रतिनिधी -जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अक्राळे येथे शाळा व्यवस्थापन समितीची मासिक बैठक उत्साहात संपन्न झाली. शासनाच्या 5 मार्च 2025 च्या शासन निर्णयानुसार सुरू असलेल्या निपुण भारत कार्यक्रमाच्या शाळेतील अंमलबजावणीचे नियोजन व सुरू असलेली कार्यवाही यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रम कालावधीत विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यामध्ये वाढ करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचा ठराव या बैठकीत संमत करण्यात आला.
     शाळेत नव्यानेच मुख्याध्यापक पदी पदोन्नतीने हजर झालेले बापू अल्हाटे सर यांचे शाळा व्यवस्थापन समितीने स्वागत केले व अभिनंदन करून सत्कार करण्यात आला. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ज्ञ सदस्य म्हणून गोविंद इचाळ यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही उपस्थित सर्वांनी सत्कार केला. 
      नवीन विद्यार्थी दाखल करणे तसेच शाळेमध्ये ई लर्निंगच्या सुविधा वाढवणे यासोबतच ऐन वेळी येणाऱ्या विविध विषयांवर चर्चा करून ठराव करण्यात आले. जागतिक जल दिनाच्या निमित्ताने आयोजित पोस्टर स्पर्धेत ज्या विद्यार्थ्यांनी पाणी बचतीचा संदेश देणारे सुंदर पोस्टर तयार केले त्यांचे उपस्थितांकडून अभिनंदन करण्यात आले. 
    शाळा व्यवस्थाप समितीचे अध्यक्ष अनिल गाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. याप्रसंगी सरपंच संदीप केंदळे, उपाध्यक्ष गोटिराम बदादे, सदस्य संजय ठोंबरे, स्वप्नील शार्दुल, सोमनाथ फलाणे, गणेश पांडव, गोविंद इचाळ, शिला डंबाळे, सचिव तथा मुख्याध्यापक बापू अल्हाटे, शिक्षक सदस्य सुनिल पेलमहाले आदी उपस्थित होते. 
    शाळेतील शिक्षक मनीषा नागपुरे, विश्वास पाटोळे, संध्या थोरात, चेतनकुमार घरटे, जयश्री शिरोडे, कमल भोये, कोमल गाडे या सर्व शिक्षकांच्या वतीने शाळेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कायम तत्पर असल्याचे आश्वासन मुख्याध्यापक बापू अल्हाटे यांनी सर्वांना दिले. शेवटी सर्वांचे आभार मानून बैठक उत्साहात संपन्न झाली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने