महाराष्ट्र ट्रायबल न्युज

सुरगाणा तहसिल कार्यालयात पंधरा ते वीस वर्षांनी जनता दरबाराचे आयोजन

आमदारांसमोर तरुणांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला प्रथमच फुटली वाचा.आदिवासी तरुण बोलू लागला.शिक्षणाचा प्रभाव. 
दरबारात अनेक तक्रारींचा पाऊस 

बाऱ्हे वार्ताहर - (ता.२३)
सुरगाणा तहसील कार्यालयात जनतेच्या समस्या समजून घेण्यासाठी ता. २१/३/२०२५ रोजी तहसिल कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यमान आमदार नितीन पवार यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा अर्थात जनता दरबार भरविण्यात आला. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार जे. पी. गावित,आदिवासी विकास सहाय्यक प्रकल्प अधिकारी अकुनरी नरेश, तहसीलदार रामजी राठोड, पोलिस निरीक्षक राहुल मोरे, 
गटविकास अधिकारी महेश पोतदार, गटशिक्षणाधिकारी अल्पा देशमुख, 
 आदिवासी सेवक चिंतामण गावित,राजू पवार, गोपाळ धुम, मोहन गांगुर्डे,सावळीराम पवार, एन. डी. गावित आदी उपस्थित होते. सुरगाणा तालुक्यात
तब्बल वीस वर्षांनी आमसभेचे आयोजन करण्यात आल्याने तरुण युवा मतदारांनी जेष्ठ राजकीय, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी तसेच विविध खात्यांचे अधिकारी यांना विकास कामांच्या तसेच लाभाच्या योजना या बाबतीत समक्ष जाब विचारण्याची संधी मिळाल्याने तरुणांच्या नेतृत्वाला संधी मिळाल्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याला प्रथमच वाचा फुटली. तरुणांनी हातात माईक घेत 
विविध खात्यांचे शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना विकास कामे व लाभाच्या योजना याबाबत जाब विचारत अधिका-यांना चांगलाच घाम फोडला आमदार पवार यांना विकास कामांबाबत तरुणांनी विचारणा केली. 
 नागरिकांनी आमदार पवार यांचेवर विकास कामांच्या बाबतीत विश्वास व्यक्त करीत समाधान व्यक्त केले आहे. जनता दरबारात प्रत्येक खातेनिहाय आढावा घेऊन अधिकारी यांनी राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती व अमंलबजावणी बाबत मार्गदर्शन करण्यात आले. या मध्ये शबरी घरकुल योजना, वीजपुरवठा, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य सेवा, घरकुल योजना, बॅंकेच्या समस्या, निराधार योजना, कृषी विभाग, वनविभाग, पाणी पुरवठा योजना, जलसंधारण, ठक्कर बाप्पा योजना याबाबत नागरिकांनी अधिका-यांना जाब विचारत धारेवर धरले. 
सुमारे पाच तास चाललेल्या जनता दरबाराचे सुत्रसंचालन तहसिलदार रामजी राठोड यांनी केले तर आभार गटविकास अधिकारी महेश पोतदार यांनी केले. या जनता दरबारात सखाराम भोये, जनार्दन भोये, हरिभाऊ भोये, भिका राठोड,चंद्रकांत वाघेरे, विजय घांगळे, रामदास केंगा, 
विजय कानडे,वसंत बागुल, इंद्रजित गावित,आनंदा झिरवाळ, तुळशीराम महाले, हेमराज धुम,कृष्णा चौधरी, पुंडलिक गांगुर्डे, रामदास केंगा, भास्कर जाधव, भरत पवार, राजु पाटील, योगेश ठाकरे, विजय दळवी, विजय देशमुख, भिका राठोड, सावळीराम पवार सह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. 
 सुरगाणा जनता दरबारात मार्गदर्शन करतांना आमदार नितीन पवार, माजी आमदार जे. पी. गावित, प्रकल्प अधिकारी अकुनरी नरेश, तहसीलदार रामजी राठोड.
उपस्थित नागरिक, प्रश्न विचारतांना युवक

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने