सुरगाणा । दि.23 प्रतिनिधी
उन्हाळ्याची सुरुवात झाल्यास वर्दळीच्या व मुख्य चौका चौकात रस्त्याच्या कडेला कामानिमित्त ये जा करणार्या नागरिकांची तहान भागविण्यासाठी सामाजिक संस्था तसेच राजकीय संघटना व दानशूर व्यक्ती स्वखर्चाने पाणपोई सुरू करून नागरिकांची तहान भागविण्याच काम करत होते. मात्र, या जागतिकीकरणाच्या युगामध्ये सद्य:स्थितीत पाण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढल्याने पाणपोई दिसत नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
आजच्या जागतिकीकरणाच्या युगात पाणपोई हरवली असून, मातीपासून बनविलेले रांजण, माठ लुप्त होताना दिसून येत आहेत.त्याची जागा फ्रिजने घेतली. पूर्वी घरातून बाहेर पडल्यानंतर तालुक्यात वर्दळीच्या तसेच रस्त्यालगत माठ, रांजण, त्यावर ओले कापड व ग्लास याप्रमाणे पाणपोईची व्यवस्था दिसायची. यातील थंड झालेले पाणी पिऊन नागरिकांची तहान भागायची. कालांतराने बदलत्या जमान्यात पाणपोई ची जागा थंड पाण्याच्या जार ने घेतली आणि आता मातीचे रांजण, माठाचा उपयोग देखील कमी झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून येणार्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी आता पैसे मोजावे लागतात. तालुक्याच्या ठिकाणी विविध कामासाठी बाहेगावाहून येणार्या नागरिकांना बाटलीबंद पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे. मात्र, ज्या गोरगरीब, सामान्य नागरिकांना पाणी पिण्याची बॉटल घेणे शक्य नाही, अशा सर्वांचे अशा सर्वांचे हाल होत आहेत.तालुक्याच्या ठिकाणी विविध कामांसाठी बाहेरगावाहुन येणार्या नागरिकांना बाटलीबंद पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे. मात्र ज्या गोरगरीब, सामान्य नागरिकांना पाणी पिण्याची बॉटल ेणे शक्य नाही, अशा सर्वांचे हाल होत आहे. त्यांना मात्र पाण्यासाठी शोधाशोध करावी लागते.