महाराष्ट्र ट्रायबल न्युज

आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्काराने सुजाता बागुल सन्मानित


निवाने -वसंत आहेर
 
      कळवण तालुक्यातील कोसुर्डे ग्रामपंचायतीमध्ये शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वी करून सर्वसामान्य जनतेचे राहणीमान उंचावून व नियमानुसार सेवा बजावत असलेल्या ठिकाणी पूर्ण कालावधी पर्यन्त कार्यरत असनाऱ्या तसेच मृदू व समाजभिमुख महिला ग्रामपंचायत अधिकारी म्हणून स्वतःची ओळख निर्माण करीत ग्रामस्थांच्या विश्वासास पात्र ठरणाऱ्या सुजाता राजाराम बागुल यांना नासिक जि प च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते सन 2023--2024 चा आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले 
       ग्रामपंचायत अधिकारी सुजाता बागुल यांनी सन 2023-2024 या आर्थिक वर्षात 15 व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून पाण्याची टाकी, नळ जोडणी, पंतप्रधान घरकुल आवास योजना,जलजीवन मिशन अंतर्गत कामे,करवसुली, अंगणवाडी डिजिटल, फेवर ब्लॉक बसवणे,ठिक ठिकाणी वृक्ष लागवड ,संगीत साहित्य,हर घर नळ योजना, गावातर्गत कॉक्रीटीकरण, गावाला शुद्ध पाणी पुरवठा,महिलांचे संघटिकरण,आदी कामे कामे करून गावाला सुशोभित केले या कामामुळे त्यांनी जेथे जेथे सेवा बजावली तेथील आदिवासी रहिवाशांचे जीवन मान उंचावण्यास मदत झाली असल्याने नासिक जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
       बागुल यांना मिळालेल्या पुरस्काराने कळवण-सुरगान्याचे आमदार नितीन पवार,जि प नासिक माजी अधक्ष्या जयश्री पवार,संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संजय बाविस्कर, जिल्हाध्यक्ष रवींद्र ठाकरे,सचिव माया लोंढे,विभागीय अध्यक्ष यौगेश पगार,तालुका अध्यक्ष अनिल चव्हाण,सचिव रामराव महाजन,सरपंच सविता बागुल,उपसरपंच भास्कर वाघ,सह ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ व कळवण तालुका ग्रामसेवक संघटनेचे पदधिकारी व सदस्य यांनी अभिनंदन केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने