महाराष्ट्र ट्रायबल न्युज

वलखेड येथे उद्या दिनांक 3 रोजी पीर बाबा यात्रा उत्सव


वलखेड (प्रतिनीधी)- दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथे गुरुवार दि. ३ एप्रिल रोजी पीर बाबा यात्रा संपन्न होत आहे. 
येथे दि. ३ रोजी होणाऱ्या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वधर्मीयांची यात्रा हिंदू मुस्लिम हे एकत्र येत ही यात्रा साजरी करतात यात्रेच्या दिवशी नवीन गव्हाच्या पोळ्या करून त्याचा मलिदा बनविला जातो त्याचा नैवेद्य हा देवाला अर्पण केला जातो एका ताटामध्ये हा नैवेद्य, अगरबत्ती, फुले असे प्रत्येक घरातील एक माणूस हा नैवेद्य घेऊन सायंकाळी ८ वा.गावात मिरवणुक निघते व देवाला नैवेद्य अर्पण केला जातो व भाविक नारळ फोडतात याला संदल म्हणतात गावात हनुमान मंदिरापासून संदलाची मिरवणूक निघून पूर्ण गावात मिरवून पीर बाबाच्या मंदिरात येऊन तेथे पूजा विधि होतो गुरुवारी दुपारी पाच ते दहा वाजेपर्यंत यात्रा उत्सव होऊन रात्री १० वा. लोकनाट्य तमाशाचा भव्य कार्यक्रम होणार आहे व दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता हजेरीचा कार्यक्रम असतो नंतर एक दिवस ठरवून भव्य टांगा शर्यती होणार आहे तरी या यात्रेत भाविकांनी येऊन याचा आनंद घ्यावा असे यात्रा उत्सव कमिटीचे हिरामण पाटील, कैलास शिंदे, योगेश शिंदे, रोशन बोंबले, दत्तू शिंदे यांनी सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने