महाराष्ट्र ट्रायबल न्युज

आगग्रस्त कुटुंबाला नाम फाऊंडेशन कर्मचाऱ्यांकडून मदतीचा हात

बाऱ्हे l नामदेव पाडवी 
       सुरगाणा तालुक्यातील वांजुळपाडा येथील एकनाथ मेघा यांच्या घराला काही दिवसांपूर्वी अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. आजच्या घडीला त्यांना मदतीशिवय पर्याय उरला नाही. एक हात मदतीचा म्हणून नाम फाऊंडेशन, पुणे कर्मचारी यांच्या मानधनातून ११ हजार रुपयाची आर्थिक मदत सुरगाणा तहसीलदार रामजी राठोड यांच्या हस्ते आगग्रस्त कुटुंबाला सुपूर्द करण्यात आली.
         यावेळी माजी जि.प.सदस्य गोपाळराव धुम, मनोहर महाले, दौलत गावीत, तुळशीराम सहारे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने