महाराष्ट्र ट्रायबल न्युज

आज‘इरदडी’ पुस्तकावर ऐसपैस गप्पाचा कार्यक्रम

दिंडोरी । प्रतिनिधी :- ग्रामीण साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष, दिंडोरी तालुका सांस्कृतिक मंचचे माजी अध्यक्ष, साहित्यीक इरदडीकार राजेंद्र गांगुर्डे यांना महाराष्ट्रात साहित्य क्षेत्रात नावाजलेल्या ’गिरणागौरव प्रतिष्ठान’ आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या गाजलेल्या उपक्रमांतर्गत त्यांच्या ‘इरदडी’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पाचा कार्यक्रम शुक्रवार दि. 11 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हुतात्मा स्मारक येथे सायंकाळी ठिक 6 वाजता संपन्न होणार आहे. तरी या कार्यक्रमाला रसिकश्रोत्यांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन गिरणागौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष माणूसमित्र सुरेश पवार दिंडोरी तालुका सांस्कृतिक मंचचे मार्गदर्शक विजयकुमार मिठे, विठ्ठलराव संधान, डॉ. विलास देशमुख, डॉ.संदीप गोसावी, तुषार वाघ, भुषण बोरस्ते, गोकुळ आव्हाड, सतीश वाळके, सचिन वडजे, प्रतिक मिठे, अमोल गणोरे आदींनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने