महाराष्ट्र ट्रायबल न्युज

दुचाकी अपघातात युवक ठार

 दिंडोरी । तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावरीलङ्गङ्गचाचडगाव येथे झालेल्या दुचाकी अपघातात म्हसरुळ येथील मंगेश संजय शिंदे (38) हा तरुण ठार झाला. मंगेश शिंदे व उमेश वाघ हे दुचाकीने (एमएच 15 जेव्ही 6405) नाशिक-पेठ रस्त्याने जात असताना चाचडगाव शिवारात अज्ञात वाहनाने धडक दिली, यात मंगेश शिंदे हा ठार झाला. तर उमेश वाघ हे जखमी झाले आहे. बाळू शिंदे यांच्या फिर्यादीवरून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने