दिंडोरी l मनोज पाटील - आदिवासी भागाचे विकासासाठी केंद्र सरकारच्या योजनांची दिंडोरी मतदारसंघात प्रभाविपणे अंबलबजावणी व्हावी यासाठी केंद्रीय आदिवासी विकास मंत्री ज्यूएल ओराम यांची खासदार भास्कर भगरे यांनी भेट घेत चर्चा करत त्यांचेकडे विविध विकासकामांना मंजुरी देण्याची मागणी केली आहे.
यावेळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील आदिवासी भागाच्या विकासाबाबत चर्चा होत विविध केंद्रीय योजना अंतर्गत आदिवासी भागाचा विकास करण्यासाठी योजना राबविण्याची मागणी करण्यात आली.
राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानांतर्गत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील मंजूर गावांचे ग्रामपंचायत इमारत बांधकाम कामांना वाढीव निधी तसेच नव्याने 66 गावांना नूतन ग्रामपंचायत इमारत मंजूर करावी व महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाला निर्देश देऊन ही कामे लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावी अशी विनंती करण्यात आली. ओरम यांनी केंद्र सरकार आदिवासी भागाचे विकासासाठी कटीबद्ध असल्याचे सुतोवाच करत विकासकामांना मंजुरी व निधी तरतूद करण्याचे आश्वासन दिले.