महाराष्ट्र ट्रायबल न्युज

वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करणे ही काळाची गरज - भाऊसाहेब चव्हाणके

दिंडोरी -मनोज पाटील 
       वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करणे ही काळाची गरज असुन विद्यार्थी किंवा भारतीय तरुण म्हणून आपण ही गरज पूर्ण करू शकतो आजच्या या धावपळीच्या युगात आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष,चुकीचं खानपान आणि त्यातून वाढणारी शारीरिक आजार अशा वेगवेगळ्या दोन मुद्द्यांवरती भाऊसाहेब चव्हाणके व प्राध्यापक प्रवीण सोमवंशी यांची राष्ट्रीय सेवा योजना दिंडोरी(आय टी आय) उपदेशक व्याख्यान पार पडले. 
         दिंडोरी येथील आय. टी. आय. मध्ये झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रम संस्कार शिबिरा प्रसंगी व्याख्यानमालेत स्वराज्य बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व स्वराज्य वृक्ष संवर्धन संस्थेचे भाऊसाहेब चव्हाणके हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. 
    यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे गट निदेशक मोरे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य शैलेंद्र नलावडे हे होते. यावेळी वृक्षरोपण व त्याचे संवर्धन त्याचबरोबर वृक्षांचे महत्व आणि त्यांना देवाचे रूप देऊन पूर्वजांनी ते वृक्ष कसे अबाधित करता येतील या विषयावर चव्हाणके यांनी मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले छत्रपती शिवाजी
 महाराज यांच्या जीवनावर आधारीत,छत्रपती शिवाजी महाराजांवरून भरपूर गुण घेण्यासारखे असून, त्याचबरोबर आत्ताच्या अत्यंत धावपळीच्या युगात आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष,आहार आणि विहार यात बदल झाल्यामुळे माणसाचे वयोमान घटत चालले असून मोठमोठ्या रोगांना आमंत्रण मिळत असल्याचे त्यांनी सांगितले तसेच प्रविण सोमवंशी यांनी आपल्या व्याख्यानात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर पुढील पावसाळ्यामध्ये आय.टी.आय संस्थेत मोठ्या प्रमाणात जागा वृक्ष लागवडीसाठी उपलब्ध असून तिथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचे मानस असून ग्वाही देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
        याप्रसंगी जे.बी.पाटील के.ई.पाटील जगदिश जाधव आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन गांगुर्डे यांनी केले, तर आभार कु.पुनम उबाळे ईने केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने