महाराष्ट्र ट्रायबल न्युज

के आर टी वणी विद्यालयाचा निकाल ८१.८४ %

वणी l प्रतिनिधी : - मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात विद्यालय वणी या विद्यालयाचा फेब्रुवारी मार्च एसएससी परीक्षा २०२४- २५ चा निकाल ८१.९४ टक्के लागला आहे .या परीक्षेस एकूण ३९१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.यापैकी ३२० विद्यार्थांनी सुयश मिळवले. यात विशेष प्राविण्यासह ४२ प्रथम श्रेणीत ९७ द्वितीय श्रेणीत ११९तर पास श्रेणीत ६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये सोहम सुनिल जाधव ९३.४०(४६४+३)टक्के गुण मिळवून प्रथम कु.आश्विनी प्रकाश सहारे ९१.६०(४५३+५)टक्के गुण मिळवून द्वितीय कदम शाहू गणेश ९०.८०(४४७+७)टक्के गुण मिळवून तृतीय पठाण अक्साखान जहिरखान ८८.२०(४४१)टक्के गुण मिळवून चतुर्थ तर नेहा राहुल मराठे८८ (४४०)टक्के गुण मिळवून विद्यालयात पाचवा क्रमांक प्राप्त केला आहे. यशस्वी सर्व विद्यार्थी व प्रथम पाच क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे मविप्र सरचिटणीस नितीन ठाकरे व सर्व पदाधिकारी दिंडोरी पेठ संचालक प्रवीण नाना जाधव शालेय समितीचे अध्यक्ष संपतराव घडवजे सर्व शालेय समिती सदस्य विद्यालयाचे मुख्याध्यापक एस एन कोतवाल उपमुख्याद्यापक आर डी गायकवाड पर्यवेक्षक पी एन चकोर एस टी इंगळे डी के टोपले आर ए भरसट श्रीमती एस व्ही सूर्यवंशी श्रीमती एस एल शिंदे एस डी मोरे एम आर रणदिवे संदीप भूरकूड परीक्षा प्रमुख जी बी उगले यांसह ग्रामस्थ सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने