maharashtratribalnews

बा-हे येथील माध्यमिक विद्यालयात उत्साहात शाळा प्रवेशोत्सव संपन्न

बाऱ्हे l नामदेव पाडवी - ता.१७डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविदयालय बाऱ्हे येथे शालेय प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांचे शालेय परिसरात रांगोळ्या काढून व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना बाऱ्हे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे, सरपंच श्रीम.वैशालीताई गावित व ग्राम.सदस्या श्रीम.छायाताई जाधव यांच्या हस्ते क्रमित पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले. यावेळी राखोंडे साहेब यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले. विद्यालयाचे प्राचार्य श्री.एम.एस.मोरे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व सांगून शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.एन. बी.अहिरे यांनी केले.तर आभार श्री.आर.टी. गावित यांनी मानले. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने