दिंडोरी । मनोज पाटील:- दिंडोरी तालुक्यातील वाघाड येथे सीआरए तंत्रज्ञान फळबाग लागवडबाबत शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
वाघाड येथील शेतकरी वाळू भवर यांच्या शेतात हवामान अनुकूल तंत्रज्ञान सीआरए फळबाग लागवड प्रात्यक्षिक घेण्यात आले. सीआरए तंत्रज्ञानाद्वारे प्रत्यक्ष शेतकर्यांना प्रात्यक्षिक सहाय्यक कृषी अधिकारी रेणुका सातपुते यांनी दाखविले. चिकू कलमाची लागवड करण्यात आली. सीआरए तंत्रज्ञानाद्वारे लागवड केल्यास झाडांच्या मुळांना थेट पाणी व अन्नद्रव्याचा पुरवठा करता येतो. हवा खेळती राहते, मुळांच्या कार्य कक्षेत वापसा स्थिती कायम राहून मुळांची वाढ चांगली होते. तंत्रज्ञान सर्व शेतकर्यांनी आत्मसात करून बदलत्या हवामानाशी जुळून घेण्यासाठी व फळबाग अधिक उत्पादनक्षम बनवण्यासाठी सदर तंत्रज्ञान अवलंब करण्याची गरज असल्याचे शेतकर्यांना प्रात्यक्षिकव्दारे सहाय्यक कृषी अधिकारी रेणुका सातपुते व पुष्पा गावित यांनी करून दाखविले. सदर तंत्रज्ञान ळबाग लागवडीमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांनी सीआरए तंत्रज्ञान वापर करूनच लागवड करावी असे आवाहन सहाय्यक कृषी अधिकारी रेणुका सातपुते यांनी केले. सदर खरीप हंगाम मोहिमेला शेतकर्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. या उपक्रमाला उपविभागीय कृषी अधिकारी अशोक दमाले, तालुका कृषी अधिकारी नाना भोये, मंडळ कृषी अधिकारी चेतन चव्हाण, उप कृषी अधिकारी शामकांत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.