त्र्यंबकेश्वर l प्रतिनिधी:-दि.३ जुलै २०२५ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र आंबोली येथे कॅन्सर तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सदर शिबिर मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.
या उपक्रमात डॉ. शिल्पा बांगर मॅडम व डॉ. वैभव बच्छाव यांनी विशेष सहकार्य केले. SDH त्र्यंबक येथून आलेल्या NCD टीम डॉ. सानिलकुमार पाटील सर, समुपदेशक अनिल फापळे, स्टाफ नर्स जयश्री पाटील, तसेच RKSK समुपदेशक रविंद्र गांगोडे आणि डॉ. मनोज पाटील (डेंटिस्ट) यांनी शिबिरात सक्रीय सहभाग नोंदवला.
तसेच स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वैशाली खिराळे मॅडम, PHC आंबोलीचे सर्व कर्मचारी, आणि DH टीम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कॅन्सर व्हॅनच्या माध्यमातून नागरिकांची तपासणी करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या उपक्रमाचे यश हे सर्व सहकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे.
सर्व सहकार्य करणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार!