पेठ l धर्मराज चौधरी :- पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पेठ तालुक्यातील गाव पाड्यात तसेच जनमन योजनेंतर्गत कातकरी बांधवांना घरकुल मंजूर झालेली आहेत शासनाने घरकुल दिलेत पण लाभार्थ्यांना हप्ते मात्र वेळेवर भेटत नाहीत आम्ही श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मांगोणे,धाब्याचापाडा, गोंदे,डोल्हारमाळ,रुईपेठा,कोहोर, लिंगवणे भुवन , या गावांमध्ये जावून भेट दिली असता लाभार्थ्यां बरोबर चर्चा केली असता फक्त पहिला हप्ता मिळालेला तर काही लाभार्थ्यांना फक्त दुसरा हप्ता मिळालेला आहे तसेच रोजगार हमीचे पैसे मिळणे बाकी आहेत तसेच एका सभासदांच्या घरी भेट दिली असता प्रभाकर विष्णू मोरे, धनराज शांताराम सुबर, एकनाथ नामदेव गोतरणे कमलाकर विष्णू मोरे अशा दहा ते बारा सभासदांची भेटी घेतली असता पाऊसा मुळे अत्यंत हालाखीची परिस्थिती झालेली आहे लहान लहान बाळांना घेवून ताडपत्रीच्या झोपपड्या करून राहतात घरकुला संदर्भ जे कोणी अधिकारी कामामध्ये कामचुकारपणा करतात संबंधित अधिकारी यांनी दोन ते तिन हप्ते मिळाले नाही तर श्रमजीवी संघटना या लाभार्थ्यांना घेऊन पंचायत समिती येथे आणि बिराड मोर्चा केल्याशिवाय राहणार नाही
पंतप्रधान आवास योजनेचा पेठ तालुक्यात रोजगार हमीचे पैसे न मिळाल्यामुळे अनेकांचे घरे उघड्यावर
byमहाराष्ट्र ट्रायबल न्यूज
-
0