पेठ l धर्मराज चौधरी:- बुधवार दि. 2 जुलै 2025 रोजी सामाजिक कार्यकर्त्या सौ. मनीषाताई घांगळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणेच एक सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करून विद्यार्थ्यांच्या आनंदात सहभाग घेतला. दाभाडी केंद्रातील उंबरपाडा (सु), दाभाडी व डोमखडक तसेच कोपूर्ली खु. या शाळांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शाळांमधील सर्वच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पूरक आहार वाटप करून दाभाडी केंद्रातील जि. प.च्या तेरा शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या सर्वच विद्यार्थ्यांना पाटी, पेन्सिल व अंकलिपी वाटप करून छोट्या मुलांचा आनंद द्विगुणित केला. याप्रसंगी दाभाडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. जाधव सर यांनी मनिषाताई घांगळे यांच्या सामाजिक कार्याची सर्वांना ओळख करून दिली. थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद आणि चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हीच आपली खरी संपत्ती असे मानणाऱ्या मनीषाताई सामाजिक मदतीत नेहमीच पुढे असतात. केंद्रातील सर्वच शिक्षकांनी त्यांच्या या कार्याचे खूपच कौतुक केले. उंबरपाडा, दाभाडी, डोमखडक, कोपूर्ली खु. शाळेचे मुख्याध्यापक व त्यांचे सहकारी यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते.
उलगुलान आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटनेचे पेठ तालुका नेते श्री. केशव महाले सर यांनी संघटनेमार्फत वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन सत्कार केला. तालुक्याच्या आदरणीय गटशिक्षणाधिकारी सौ. सुनीता जाधव मॅडम यांनीही मनिषाताई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रप्रमुख श्री. जाधव सर यांनी केले.