maharashtratribalnews

लोकनेते व्यंकटराव हिरे पुण्यतिथी निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम.

देवडोंगरी l शंकर निंबारे :- त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसल येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात संस्था संवर्धक लोकनेते व्यंकटराव हिरे यांची पुण्यतिथी निमित्त मोठ्या उत्साहाने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोतीराम देशमुख यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून पुण्यातिथी साजरी करण्यात आली.
      या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देशमुख यांनी लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल माहिती सांगताना म्हणाले की, "लोकनेत्यांनी नाशिक जिल्ह्यात अनेक शाळा, महाविद्यालये व आदिवासी आश्रमशाळांची उभारणी केली. वसतिगृह सुरू केले.त्यांच्या या कार्यामुळे नाशिक जिल्ह्याची शैक्षणिक क्षेत्रात मोठी प्रगती झाली. नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण ह्या आदिवासी बहुल तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आश्रमशाळा,वसतिगृह सुरू करून शिक्षणाची ज्ञानगंगा आदिवासी बांधवांपर्यंत पोहचवली. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विकासात लोकनेते व्यंकटराव हिरे यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी सर्व सामान्य जनतेचे प्रश्न विधानसभेत मांडले. मालेगाव तालुक्यातील जनतेचा पाणी प्रश्न त्यांनी सोडविला. त्यांच्या प्रयत्नांमुळे मालेगाव तालुक्यातील खेड्यापाड्यात वीज पोहचली. त्यांच्या ह्या कार्यामुळेच जनतेने त्यांना लोकनेते ही पदवी दिली. त्यांचे हे कार्य सदैव प्रेरणा देत राहील"
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला.
     याप्रसंगी, महाविद्यालयाच्या शैक्षणिक पर्यवेक्षक डॉ. मीनाक्षी पाटील, डॉ.अजय अहिर, प्रा.श्रीकृष्ण जाधव सर्व प्राध्यापक वर्ग, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी वर्गही यावेळी उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.कुणाल वाघ यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने