बाऱ्हे l नामदेव पाडवी:- सुरगाणा तालुक्यातील डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ.विजय बिडकर इंग्लिश मिडीयम स्कूल, माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बा-हे येथे आषाढी एकादशी निमित्ताने महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीच्या पांडूरंगाची वारकरी दिंडी मोठया उत्साहात काढण्यात आली. या दिंडीत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वारकरी वेषभूषेत, टाळ-मृदंगाच्या गजरात, अभंग व भजने गात विद्यालयातून खडकपाडा - बा-हे गावातून प्रभात फेरी काढून बिरसा मुंडा चौकात थांबून उपस्थितांची मने जिंकली.
प्राचार्य मधुकर मोरे तसेच शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी विठू माऊलीला पुष्पहार अर्पण करून विठू माऊलीच्या गजरात या दिडींचा समारोप करण्यात आला. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांचा दिंडीत मोठा सहभाग होता.