पुनदखोरे l पुंजाराम खांडवी: शुक्रवार दि.४ या दिवशी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा पिंपळे बुद्रुक ता कळवण व सामाजिक वनीकरण विभाग, कळवण यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
मा.प्रकल्पाधिकारी सो.एका.आदि.वि.प्रल्प कळवण यांच्या संकल्पनेतील "एक कर्मचारी-एक झाड" तसेच शासन परीपत्रकान्वये "एक पेड मॉं के नाम" या उपक्रमांतर्गत श्रीमती मानसी पाटील मॅडम वनपरीक्षेत्र अधिकारी,सरपंच मा.रमेश बागुल,वनविभागाचे कर्मचारी व शालेय कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा .मानसी पाटील (RFO) ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच रमेश बागूल, जेष्ठ नागरीक बाबूराव गायकवाड, उपस्थित होते.प्रसंगी मा महाले साहेब(वनपाल),बागुल भाऊसाहेब, मा.गावित मॅडम ,
मा.न्हावकर साहेब,श्री आहिरे डी व्ही.(प्राथ.मुख्याध्यापक),श्री गातवे के.एम. ( माध्य.मुख्याध्यापक) आदी उपस्थित होते.
सर्व अतिथींचा शाळेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
वन विभागाच्या वतीने फळझाडे तसेच फुलझाडे शालेय आवारात पाहुण्यांच्या व विद्यार्थ्यांच्या हस्ते शालेय आवारात लावण्यात आली.
प्रसंगी सर्व विद्यार्थी व कर्मचारी यांनी वृक्ष लागवड करून संगोपन करण्याचा संकल्प केला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सूर्यवंशी सर यांनी केले.आभार श्री सुमराव सर यांनी मानले.