दिंडोरी । मनोज पाटील:- दिंडोरी येथील श्री ईशान्येश्वर विद्यानिकेतन व ज्युपिटर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त ‘दिंडी सोहळा’ उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपारीक वेशभुषा करुन या पवित्र दिंडी सोहळ्याचा आनंद घेतला. दिंडी सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणीची भक्तिगीते सादर केले. दिंेडी शाळेच्या प्रांगणातून निघाली व इंदिरानगर येथे नेण्यात आली. विद्यार्थ्यांनी ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषामध्ये संपूर्ण शाळेचा परिसर, इंदिरानगर परिसर, उमराळे रोड परिसर दुमधुमून टाकला. यावेळी दिंडीत सहभागी वारकरी वेशभुषेतील मुली व मुले यांनी फुगडी खेळाचा आनंद घेतला. यावेळी रस्त्यावर असलेल्या महादेव मंदिरात जावून विद्यार्थ्यांनी दर्शन घेतले. यावेळी शिक्षिका अंचल तिवारी, श्वेता वानखेडे, कल्याणी केदारे यांनी आषाढी एकादशीच्या परंपरेचे महत्त्व स्पष्ट केले. याप्रसंगी अरुणा पारधी, अश्विनी चव्हाण, मनोज पाटील आदी उपस्थित होते.