सुरगाणा l कृष्णा पवार:- पर्यावरण संवर्धन आणि हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत सर्कलपाडा येथे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात ग्रामस्थांचा व महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला.
या कार्यक्रमात ग्रुप ग्रामपंचायत बा-हे सरपंच देविदास गावित, उपसरपंच भास्कर वार्डे, तसेच योगीराज जाधव, युवराज जाधव, स्वदेश फाउंडेशनचे दिपक गिऱ्हे व त्यांची टीम व बिरसा मुंडा गाव विकास समिती सर्कलपाडा (बा-हे) यांचे विशेष सहकार्य लाभले. ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली.
कार्यक्रमाच्या निमित्ताने परिसरात पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी वृक्षाचे महत्त्व अधोरेखित करत सातत्याने अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
बिरसामुंडा गाव विकास समिती बाऱ्हे सर्कल पाडा येथे रुक्षारोपण करण्यात आले.त्या वेळी आपल्या तालुका व्यवस्थापक श्री दीपकजी गिऱ्हे साहेब आणि डोनर टीम.ही अध्यक्ष यांच्या शब्दाला मान देऊन .कार्यक्रमाला उपस्थित झाले त्या बद्दल बिरसा मुंडा गाव विकास समिती बाऱ्हे सर्कल पाडा आणि गावकरी यांच्या कडून खूप खूप आभारी आहेत.
अशा प्रकारे त्यामध्ये ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते व युवकांच्या एकत्रित प्रयत्नामुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.