maharashtratribalnews

ग्रुप ग्रामपंचायत सराडच्या वतीने शालेय साहित्य वाटप कार्यक्रम

बोरगाव l प्रतिनिधी
जिल्हा परिषद शाळा सराड येथे दिनांक 27 जून 2025 रोजी ग्रुप ग्रामपंचायत सराड यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरणारे साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेस, टेबल, खुर्च्या व कपाट यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सराडचे सरपंच श्री. नामदेव देवराम भोये होते. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, शाळेचे मुख्याध्यापक, व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
   शालेय विद्यार्थ्यांना या उपक्रमामुळे शैक्षणिक व सहशालेय उपक्रमात अधिक चांगला सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. गावकऱ्यांनीही या उपक्रमाचे स्वागत करत ग्रामपंचायतीचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने