महाराष्ट्र ट्रायबल न्युज

जऊळके वणीत ट्रॅक्टरची मिरवणूक

दिंडोरी l मनोज पाटील:- दिंडोरी तालुक्यातील जऊळके वनी येथे सर्जा राजाचे मिरवणुकीबरोबर ट्रॅक्टरची मिरवणूक काढण्यात आल्याने सर्वांचे लक्ष वेधुन घेतले होते.
    शेतीमध्ये आधुनिकीकरण वाढल्याने पारंपारिक बैलांचा वापर हळूहळू कमी होत आहे. शेतकर्‍यांनी शेतीच्या मशागतीसाठी बैलांच्या जागी ट्रॅक्टरचा वापर सुरू केला आहे. ट्रॅक्टरने शेतीची कामे होत असल्याने बैलांप्रमाणे ट्रॅक्टरचा पोळा भरविण्याची संकल्पना पुढे आली. दिंडोरी तालुक्यातील जऊळके वणी येथे यावर्षीपासून ट्रॅक्टर पोळा भरविण्यास सुरुवात झाली आहे. जऊऴके वणी येथे तरुणांच्या संकल्पनेतून बैलपोळ्याच्या स्मरणार्थ लुप्त होत चालली आहे. बैलांच्या स्मरणार्थ सगळ्यांनी एकत्र येऊन एक चांगला विचार पुढे आणून बैल जे काम करत होता त्या कामाचे स्वरूप त्यानुसार ट्रॅक्टरची पूजन करून ट्रॅक्टरला मान-पान देऊन वंदना करून एक नवीन संकल्पना या युगामध्ये या तरुणांनी सादर केली. या नवीन संकल्पनेला शेतकर्‍यांचा प्रतिसाद मिळाला आहे. सायंकाळी पाच वाजता सजवलेल्या ट्रॅक्टरची रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये जवळपास शंभरहून अधिक ट्रॅक्टर सहभागी झाले होते. मारुती मंदिर समोर प्रदक्षिणा मारण्यात आले. स्पर्धेच्या युगात आधुनिक शेती बरोबरच वेळ व मजुरीची बचत होण्यासाठी शेती मशागतीसाठी ट्रॅक्टरचे मोठे योगदान असून पोळा सणाचा चालत आलेला पारंपारिक सण उत्सव टिकवण्यासाठी जवळके वणी गावात सर्जा राजा बरोबरच गावातील शेतकर्‍यांनी ट्रॅक्टरांची मिरवणूक काढून पोळा सण साजरा करण्यात आला

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने