महाराष्ट्र ट्रायबल न्युज

पालखेड बंधारा येथील दफन भुमि अतिक्रमण काढण्याची मागणी

दिंडोरी । प्रतिनिधी :- पालखेड बंधारा येथील दफन भुमि अतिक्रमण काढावे, अशी मागणी विश्‍व हिंदु परिषद बजरंग दलाने जिल्हाधिकार्‍यांकडे केली असून याप्रकरणी कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा बजरंग दलाचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रदेशप्रमुख भास्कर भगत यांच्यासह कार्यकर्त्यांनी दिला आहे. 

पालखेड बंधारा येथील गट क्रमांक 387/ ब 20 आर जागा मुस्लिम समाजाला दिलेली असताना तिथे दफन विधी केला जात नाही आणि गट नंबर 326 चे क्षेत्र 0.50 आर हा शासकीय मालकीचा असतानाही येथे दफन भूमीच्या नावाखाली मुस्लिम समाजाने केलेल्या अतिक्रमणाबाबत हा गट 326 चे क्षेत्र 0.50 आर हे क्षेत्र गीळण्याच्या मार्गावर आहे तरी प्रशासनाला वारंवार कळवले असतानाही याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. याबाबत विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्यावतीने निवेदन देत आहे. या निवेदनावर वरिष्ठांकडून जर येत्या आठ ते दहा दिवसांत कुठलीही कारवाई झाली नाही तर दि. 10 सप्टेंबर 2025 रोजी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल स्वतः रस्त्यावर उतरून अतिक्रमण हटवावे. ण्याचे काम करेल यावर होणारे परिणाम शासकीय अधिकारी जबाबदार राहतील याची दक्षता घ्यावी. या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर तात्काळ तक्रार दाखल करून अतिक्रमण हटवावे, अशी मागणी विश्‍व हिंदु परिषद बजरंग दलाचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रदेशप्रमुख भास्कर भगत, संयोजक विकी वरंदळ, दिंडोरी तालुका संयोजक सागर शिंदे, मित्रानंद जाधव, शामराव बोलकर, कांता देवगुरु, युवराज गवे आदींनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने