बोरगाव l प्रतिनिधी:- शिक्षण हा समाज घटकाचा महत्वाचा कणा आहे. शिक्षणाने व्यक्तीचं सर्वांगिण विकास होत असतो आणि या शिक्षणाचे केंद्र म्हणजे शाळा. शाळा चांगल्या असल्या तर शाळेतून गुणवंत विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडतात. म्हणून शाळा या चांगल्या अशान्यात. सर्वसाधारण व खेड्यातील जनतेचा शिक्षणाचा केंद्र बिंदू म्हणजे जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा. या शाळांची गुणवत्ता सुधारावी म्हणून शाळेत विविध उपक्रम घेतले जातात. ज्या मुळे आज जिल्हा परिषदेच्या शाळेकडे समाजाचा व पालक विद्यार्थांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे.
कळवण तालुक्यातील मोहपाडा जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनी कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा काल मेळावा पार पडला. या मेळाव्यात मोहपाडा गावातील माजी विद्यार्थांनी उपस्थिती लावली. यावेळी शिक्षण किती महत्वाचे आहे, तसेच खेडो-पाडयात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता कशी उंचावता येईल यावर मनोगत व्यक्त केले. जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिक्षण घेतल्या नंतर आज आम्ही विविध क्षेत्रात नोकरी करतो. आमचा विकास झाला म्हणून या शाळांना विसरून चालणार नाही. तर या शाळा टिकाव्यात म्हणून आमचे देखील या शाळांसाठी देणे लागते. तेव्हा आम्ही या शाळेला हवी तेव्हा मदत करू असे आश्वासन माजी विद्यार्थ्यानी दिले. यावेळी या विद्यार्थ्यांनी शाळेतील आपल्या जून्या आठवणींना उजाळा दिला.
या मेळाव्याचे आयोजन मोहपाडा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विलास भोय सर यांच्या मागदर्शना केले तर बेबी बागूल, भरत चव्हाण, मनोहर गायकवाड या शिक्षकांनी मोलाये सहकार्य केले. यावेळी मोठ्या संख्येने गावातील माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.
" देवालयांना निधी किंवा देणगी देण्यापेक्षा गावातील विद्यालयांना मदत केली तर शाळांचे नक्कीच रूप बदलेल. मराठी शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवे. या शाळेमधून शिक्षण घेतलेले विद्यार्थी विविध क्षेत्रातील उच्च पदावर कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा टिकवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे."
-पुंडलिक जाधव, माजी विद्यार्थी