महाराष्ट्र ट्रायबल न्युज

*ढकांबे येथे दरोडा टाकून लाखोंचा ऐवज लंपास*

दिंडोरी । प्रतिनिधी :- दिंडोरी तालुक्यातील ढकांबे येथे दरोडा टाकून मारहाण करुनसोन्याची पोती, कानातील सोन्याचे कुडके यांच्यासह काही रोख रक्कमेसह लंपास केला असून आरोपी फरार झाले आहे. 
     ढकांबे येथे काल रात्रीच्या सुमारास धात्रक कुटूंबियाच्या घरावर दरोडा टाकला.घरांची दरवाजाची आतील कडी तोडून आत प्रवेश करुन ताराबाई मनोहर धात्रक, सुरेश मनोहर धात्रक, मनोहर बारकु धात्रक यांना हत्याराने जीवे मारण्याचा धाक दाखवला. हत्याराने मारहाण करुन गंभीर जखमी केले. परंतू कुटूंबियांना जबरी मार लागल्याने नाशिक खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपींनी सत्तर हजार रुपयांचे दोेन सोन्याच्या मणी असलेल्या पोती प्रत्येक अंदाजे 5 ग्रॅम, दहा हजार रुपयांचे कानातील सोन्याचे कुडके अंदाजे 1 ग्रॅम यासह अडीच ते तीन लाखांची रोख रक्कम व ऐवज लंपास करण्यात आला. याबाबत दिंडोरी पोलिस ठाण्यात अज्ञातविराोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासह मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मनोज खुळे करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने