महाराष्ट्र ट्रायबल न्युज

अवनखेड येथे २५ मार्च रोजी मोफत भव्य महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

अवनखेड l प्रतिनिधी :- सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, परनॉड रेकॉर्ड इंडिया व वोक्हार्ट फाउंडेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) अवनखेड तसेच ग्रामपंचायत अवनखेड यांच्या संयुक्त विद्यमाने वार बुधवार दिनांक २५ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय शेजारी, अवनखेड येथे भव्य मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
    या शिबिरामध्ये विविध तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार असून नागरिकांसाठी जनरल तपासणी, हाडांची तपासणी, स्त्रीरोग तपासणी, बालरोग तपासणी, कान, नाक-घसा तपासणी, तसेच तुलशी हॉस्पिटलतर्फे नेत्ररोग तपासणी, त्वचारोग तपासणी आणि दंतरोग तपासणी अशा विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
    यासोबतच शिबिरात मोफत ECG तपासणी, X-ray तपासणी, रक्त तपासणी, सॅनिटरी पॅड वाटप, चष्मे वाटप यांचाही समावेश आहे. तसेच रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.
तरी अवनखेड व परिसरातील सर्व नागरिकांनी या महाआरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने